महान फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन
महान फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन
अर्जेंटिनाचे:अर्जेंटिनाचे महान फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. वयाच्या ६० व्या वर्षी दिएगो यांनी अखेरचा श्वास घेतला.
जगभरातील फुटबॉल रसिकांचे आवडते खेळाडू म्हणून दिएगो मॅराडोना यांचे नाव घेतले जाते. त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांतून समोर येत आहे.मॅराडोना यांना मागील दोन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.जगातील एक महान फूटबॉलपटूंपैकी एक म्हणून दिएगो यांचे नाव आदराने घेतले जाते. १९८६च्या विश्वचषकात अर्जंटिनाला विजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

Comments
Post a Comment