रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला केले मास्क वाटप


रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व कॉंग्रेस नेते बाळा मयेकर यांनी चांगल्या दर्जाचे मास्क रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाला मोफत दिले. कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी काळजी घेण्याच्या अनुषंगाने मास्कचा वापर करावा अशा सुचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. 

याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहर कॉंग्रेस कमिटिच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष राकेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अशपाक काद्री, शहर चिटणीस प्रीतम पिलणकर, सचिन मयेकर आदी उपस्थीत होते. यावेळी मास्क जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा गावडे-फुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Comments