दिवाळीत देवरूख शहरातून वाहतूक सुरळीत पार पडावी भाजपा कडून पोलिसांना निवेदन
येणाऱ्या आठवड्यात दिवाळी आणि भाऊबीज सण लक्षात घेता देवरूख शहरात वाहतुक सुरळीत पार पडावी यासाठी भाजपकडून पोलीसांना निवेदन देण्यात आले आहे. देवरूख हे शहर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असून ग्राहकांचा खरेदिचा कल देवरूखात जास्त असतो.
वाहतूकीची कोंडी होऊ नये, ग्राहकांना आणि व्यापारी वर्गाला यामुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस.टी.स्टॅंड, मुख्य बाजारपेठ, माणिक चौक, मातृमंदिर चौक या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करून नागरिकांची सोय करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदन भाजप युवा नेते भगवतसिंह चुंडावत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री.तुषार पाचपुते यांना देण्यात आले. सोबत भाजप ओ.बी.सी.सेल देवरूख शहराध्यक्ष यशवंत गोपाळ, युवा मोर्चाचे अमोल गायकर उपस्थित होते.

Comments
Post a Comment