कोकणातील २० रेल्वे स्थानकांवर दर्जेदार प्लॅटफाॅर्म्सची उभारणी करण्यात यावी
कोकण रेल्वे मार्गावरील सुमारे २० रेल्वे स्थानकांवर प्लॅटफाॅर्म्स नसल्या कारणाने प्रवाशांची गैरसोय होते. रेल्वे पर्यंत पोचण्यास अनेक गैरसोयींशी सामना करावा लागतो. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवर सुसज्ज व दर्जेदार प्लॅटफाॅर्म्सची उभारणी करण्यात यावी अशी मागणी भाजपा नेते व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुश गोयल यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात प्रमोद जठार यांनी एक निवेदन देखील सादर केले आहे. हे निवेदन खासदार विनय सहस्त्रबुद्धे व खासदार नारायण राणे यांना देखील सादर करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड, गोरेगाव, इंदापूर, विन्हेरे, दिवाणखवटी, आडवली, निवसर, भोके, कामथे, सावर्डे, सौंदळ आदींसह २० रेल्वे स्थानकांवर प्लॅटफाॅर्म्सची आवश्यकता आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफाॅर्म्सची उभारणी करण्यात यावी अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली आहे.

Comments
Post a Comment