रत्नागिरीत हे कधी होणार याची उत्सुकता...अवैध व्यवसायाला पाठबळ देणे भोवले : तीन पोलिस कर्मचार्यांना निलंबित सक्त ताकीद करूनही छापा न टाकता ३० हजाराची तिघांनी केली ताेडी....!
जिल्ह्यात रुजू होताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी अवैध धंदे चालणार नाहीत, अशी सक्त ताकीद पोलिसांना दिली होती. तरीदेखील रेशन दुकानात छापा टाकून कारवाई न करता 30 हजार रुपयांची तोडी केली. अवैध व्यवसायाला पाठबळ दिले.
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिग्रस पोलिस ठाण्यात कार्यरत डी.बी. पथकातीन तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या कारवाईने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नितीन वास्टर, अरविंद कोकाटे व अरविंद जाधव, अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जुगार, गुटखा, अवैध व्यवसायावर छापा टाकून लाचेची मागणी करणे, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस न आणता स्वत:साठी पैशांची मागणी करणे, पोलिस ठाण्याची गोपनीय माहिती पुरविणे, डी.बी. पथकात नेमणुकीसाठी राजकीय दबाव आणणे, अवैध धंदे व्यावसायिकांच्या संपर्कात राहून पार्टनरशिपमध्ये ठेवण्यास प्रवृत्त करणे, चोरीच्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी देणे, छापा टाकण्यासाठी बाहेरचे पोलिस आल्यास माहिती पुरविणे आदी शिस्तभंगाचा ठपका तिघांवर ठेवण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, दिग्रस शहरातील गवळीपुरा भागात रेशन दुकानात छापा टाकला होता.
कारवाई न करता गुलाब नौरंगाबादे यांच्या मुलाकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातील 30 हजार रुपये स्वीकारले. ए.सी.बी.कडे तक्रारदार गेल्याची माहिती मिळताच तिघेही रजेवर गेलेत. या घटनेची गंभीर दखल पोलिस अधीक्षकांनी घेतली. वरिष्ठांच्या आदेशालाडावलने तिघांनाही भोवले. निलंबन कालावधीत त्यांना पोलिस मुख्यालयात राहावे लागणार आहे.

Comments
Post a Comment