रत्नागिरी पालिकेच्या 'त्या' ठरावाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


पालिकेत एक कंपू तयार झाला आहे. तो फक्त पालिकेला लुबाडण्याचे काम करतो. शहरातली आलिमवाडी येथे साठवण टाकी बांधण्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध आहे. तरी 3.88गुंठे खासगी जागा खरेदीचा घाट घातला जातो. गेल्या वर्षी 17 लाख रुपये किंमत असलेली जागा मात्र एक कोटी 27 लाख 32 हजार रुपये एवढी महाग झाली. 

पालिकेने केलेले हे मूल्यांकन म्हणजे जागा खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. पालिकेचेही आर्थिक नुकसान होते. त्यामुळे 308 खाली हा ठराव रद्द करण्यात यावा, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद कीर यांनी दिली. जयस्तंभ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, शहराध्यक्ष नीलेश भोसले, बंटी वणजू आदी उपस्थित होते.

Comments