राजापूर तालुक्यातील २५३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून ४८७९ विद्यार्थी घेत आहेत ऑनलाईन शिक्षण

 गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंकी विशेष परिश्रम


रत्नागिरी प्रतिनिधी:-

कोव्हिड-१९ मुळे प्राथमिक शाळा अद्याप सुरु झालेल्या नाहित. मात्र  ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. नुकतेच ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राजापूर तालुक्यातील २५३ जिल्हा परिषद शाळांमधून ४८७९ विद्यार्थी, इतर व्यवस्था असलेल्या ४० ठिकाणांमधून ६५५९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑफलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ३०३ जिल्हा परिषद शाळांमध्ये ४१२७ व इतर व्यवस्था असलेल्या ४३ ठिकाणांमध्ये २७०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्थानिक प्रतिनिधी किंवा तरुणांमार्फत शिक्षण देण्याच्या व्यवस्थेमधून १४ जिल्हा परिषद शाळांमध्ये १६६, इतर व्यवस्था असलेल्या २ ठिकाणांमधून १९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजापूर तालुक्यात नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र सुरु आहेत. हे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरळीत सुरु आहे. यासाठी राजापूरचे गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंकी व विषय तज्ज्ञ शशिकला लोंढे विशेष परिश्रम घेत आहेत. 

राजापूर तालुक्यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंकी विशेष परिश्रम घेत आहेत.



Comments