कोकण पेन्शन अदालत १० नोव्हेंबर रोजी


कोकण विभागातील पेन्शन अदालत दि. १० नोव्हेंबर २० रोजी सकाळी १०.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोंकण भवन (सामान्य), शाखा नवी मुंबई येथे होणार आहे. या अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणाच्या अडचणीचे निवारण करण्यात येईल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तक्रारी असल्यास त्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील.

Comments