शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आर्थिक मदत देण्याची समविचारीची मागणी


मार्च पासून लॉकडाऊन सुरु झाले.शाळा महाविद्यालये बंद झाली.शालेय विद्यार्थी वाहतूक करुन उपजीविका करणाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला.जिल्ह्यातील अनेकांना याचा फटका बसल्याने या वर्गाची आर्थिक ससेहोलपट सुरु आहे.

अशा व्यवसायिकांना शासनाने या ना त्या मार्गाने आर्थिक मदत करावी अशी मागणी समविचारी मंचचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,राज्य चिटणीस विनय माळी,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवा प्रमुख निलेश आखाडे,आदींनी निवेदनाधारे शासनाकडे केली आहे. 

पालक आणि विद्यार्थी यांच्याशी अतुट नाते निर्माण झालेला हा वर्ग शाळा बंद आणि कोरोना महामारी या दुष्टचक्रात सापडल्याने अधिकच चिंतीत झाला आहे.बाल संगोपन जबाबदारीचे काम करणाऱ्या या वर्गाला शासनाने योग्य पर्याय आधारे सहकार्य करावे असे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर आणि राज्य चिटणीस विनय माळी यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

Comments