भाजप चिपळूणतर्फे वीजबिल होळी आंदोलन
चिपळूण:निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारने कोविड काळात नागरिकांना भरमसाट वीजबिले देउन जनतेचे कंबरडे मोडले. भरमसाठ आलेली वीजबिले माफ करण्यासाठी भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद भोबस्कर, शहर अध्यक्ष आशिष खातू यांच्या नियोजनातून चिपळूण महावितरण कार्यालय समोर वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालयातून प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा निलम गोंधळी, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी प्रणय वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण महावितरण कार्यालयपर्यंत निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, विजबिल माफ करा नाहीतर खुर्चा खाली करा, ठाकरे सरकारचा निषेध असो, अशा प्रकारे घोषणा देत महावितरण कार्यालय समोर वीजबिलांची होळी करण्यात आली. लाॅकडाउनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यांवरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, इत्यादींना स्वत:हून पॅकेज दिलेले नाही, उलट वीज कंपन्याच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना भरमसाट वीजबिले आली. महाविकास आघाडी सरकारने याबाबत सवलत देण्याचे जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या उर्जा मंत्री मा. नितीन राऊत यांनी वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व आलेली बिले नागरिकांना भरावी लागतील असे स्पष्ट पणे सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण कंपनी सक्तीने वीजबिले वसुल करण्याच्या प्रयत्नात आहे. उर्जा मंत्री मा. नितीन राऊत यांनी दिलेला शब्द न पावल्यामुळे तसेच या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चिपळूणच्या वतीने वीजबिलांची होळी करुन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा कोषाध्यक्ष आशिष जोगळेकर, जिल्हा चिटणीस परिमल भोसले, संतोष वरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपाशेठ देवळेकर, अशोक भडवलकर, अजित साळवी, महेश दिक्षित, विजय चितळे, नगरसेविका रसिका देवळेकर, सौ. नुपुर बाचीम, कामगार आघाडी जिल्हा संयोजक विनोद कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, शिक्षक सेल जिल्हा संयोजक सोमनाथ सुरवसे सर, माजी सैनिक सेल जिल्हा संयोजक दिपक चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष सतिश मोरे, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, मारुती होडे, शहर सरचिटणीस मधुकर निमकर, उपाध्यक्ष संदिप सुखदरे, सुरेशराव कदम, संजय पंडव,रोहित हटकर, कोषाध्यक्ष बंडूशेठ थरवल, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. प्रतिज्ञा कांबळी, महिला ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्षा सौ. रोहिणी मेंगे, युवती प्रमुख कु.समिक्षा भालेकर,मोर्चा ,आघाडी, सेल चे पदाधिकारी सौरभ चव्हाण, गणेश नलावडे, प्रकाश तांबीटकर, ओंकार बापट,विजय पवार, उल्हास भोसले, अभयराज विश्वकर्मा, प्रथमेश भोबस्कर, मंदार कदम,राकेश नलावडे, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment