महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशनच्या सचिवपदी साखरप्याचे प्रताप कचरे यांची निवड

 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशनच्या सचिवपदी साखरप्याचे प्रताप कचरे यांची निवड 

देवरूख : प्रतिनिधी 

नुकत्याच रत्नागिरी येथे पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक फेडरेशनची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील काही सभासदांची निवड करण्यात आली. यात  साखरपा महावितरण कार्यालयामध्ये कार्यरत असणारे कॉ. प्रताप कचरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. 

                याआधी या संघटनेचे ते उपसचिव म्हणून कार्यरत होते. ही संघटना वीज क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून ओळखली जाते. या संघटनेने कामगारांवर होणाऱ्या अन्याया विरोधात अनेक आंदोलने केली आहेत व कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. वर्कर्स फेडरेशन संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. अतिशय शांत मनमिळावू व सर्वांच्या मध्ये सहभागी होणारे व सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्य करणारे अशी श्री.कचरे यांची ओळख आहे.या पदाची सूत्रे घेतल्यानंतर मी या पदाला न्याय देण्याचा १००%प्रामाणिक प्रयत्न करेन व कामगारांना न्याय मिळवून देईन असे श्री.कचरे यांनी सांगितले.त्यांना प्राप्त झालेल्या या पदामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

फोटो- प्रताप कचरे



Comments