नगर परिषद सभेत पत्रकारांना नो एन्ट्री पत्रकार संघटनांकडून निर्णयाचा निषेध
रत्नागिरी : शहरातील आलीमवाडी येथे पाणी साठवण टाकीसाठी सव्वा कोटी किमतीला जमीन खरेदी करण्याचा नगर परिषदेचा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या विषयावरून भाजप, राष्ट्रवादीने आक्षेप घेतलेला असतानाच आजच्या नगर परीषद सर्वसाधारण सभेत या विषयावर निर्णय घेण्यासाठी चर्चा होणार असतानाच सभेचे वृत्तांकन करण्यास पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारल्याने पत्रकार संघटनांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. प्रत्येक सभेतील कामकाजाचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना या महत्त्वाच्या सभेसाठी कारण दाखवून प्रवेश नाकारण्यात आला. जर या व्यवहारात पारदर्शकता असल्याचे सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर प्रसारमाध्यमांना टाळण्याचे कारण काय असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. त्यामुळे साठवण टाक्यांमध्ये पाणी मुरत नाही ना, हा जनतेचा संशय अधिकच बळावला आहे.

Comments
Post a Comment