खेड येथील शाळकरी दोन मुलींचा मृत्यू आढळल्या
खेड:अस्तान कातकरीवाडी येथे दोन शाळकरी मुली सायंकाळी त्यांच्या घरात अत्यवस्थ स्थितीत आढळल्या.त्यांना आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,भारती हिलम (वय 15 इयत्ता दहावी ) व साक्षी निकम ( वय 12 इयत्ता नववी ) अशी त्यांची नावे आहेत . भारती साक्षीकडे पाहुणी आली होती.साक्षीचे वडील हे शिक्षक - पालक संघाच्या बैठकीसाठी आंबवली हायस्कूलमध्ये गेले होते . बैठकीनंतर ते घरी गेले असता त्यांना दोन्ही मुली घरातच अत्यवस्थेत आढळल्या . दोघींना तातडीने आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले . दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले . या दोघींच्या मृत्यूचे कारण पोलिस यंत्रणा तपासत आहे.
Comments
Post a Comment