गुहागर काँग्रेस तर्फे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

 गुहागर(प्रतिनिधी): येथील काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती गुहागर काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रियाज ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली शृंगारतळी येथे साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. 

यावेळी  यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. इंदिराजींनी देशासाठी दिलेले बलिदान आपण विसरू शकत नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी,  राहुल गांधी,  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,रत्नागिरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले साहेब आदींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि गुहागर तालुका उपाध्यक्ष रियाज ठाकुर यांचे हात बळकट करूया  असा निर्धार उपस्थितीतांनी यावेळी केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Comments