ग्रंथालयांची यंदाची दिवाळी अंधारातच
सार्वजनिक ग्रंथालयांना दरवर्षी दोन हप्त्यात अनुदान मिळते. या अनुदानातून पगार, पुस्तक खरेदी, वर्तमानपत्र व इतर खर्च केला जातो. गेले आठ महिने ग्रंथालय बंद असल्याने सभासद वर्गणी, समाजाकडून देणगी असे सर्व मार्ग बंद असल्याने ग्रंथालये शासनाचे अनुदानकडे डोळे लावून बसलेली आहे. आता दिवाळी चार दिवसांवर आली तरीही अद्याप अनुदानाचा पहिला हप्ता ग्रंथालयांना मिळालेला नाही.
पहिला हप्ता मिळाला की अनेक ग्रंथालये ग्रंथ खरेदी करतात व ग्रंथ विक्रेत्यांना पैसे मिळतात, मात्र अनुदान नसल्याने ग्रंथ खरेदी झालेली नाही. त्यामुळे ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथविक्रेते यांना दिवाळी कशी साजरी करायची, याची विवंचना लागली आहे. दिवाळीत घरोघरी दीप उजळतील, पण मनामनात ज्ञानदीप उजळण्याचा मार्ग दाखवणारी ग्रंथालये दुर्दैवाने अंधारात राहणार आहेत.

Comments
Post a Comment