मुंबईत ओबीसी समाजबांधवांचे आंदोलन
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे सरचिटणीस अरविंद डाफळे आणि कायदेशीर सल्लागार अँड. अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजबांधवांनी मुंबई- बोरीवली तहसिलदार कार्यालय येथे मंगळवारी आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना आदिंसह विविध मागण्यांसाठी समस्त ओबीसी समाजबांधवांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणा देण्यात आल्या. निदर्शने केल्यानंतर अरविंद डाफळे व अँड. अजय पाटील यांच्यामार्फत तहसिलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांसंदर्भात डाफळे व अँड. पाटील यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. तर श्री. संत तुकाराम सेवा संस्था व सक्रीय कुणबी समाजाचे अध्यक्ष भगवान पोवळेकर आणि सचिव अरविंद वजीरकर यांनी उपस्थित समाजबांधवांचे आभार मानले.
फोटो- मुंबई- बोरीवली तहसिलदार यांना निवेदन सादर करताना अरविंद डाफळे, अँड. अजय पाटील व अन्य.


Comments
Post a Comment