संगमेश्वर तालुक्यात मनसेचा झंझावाती दौरा

 


ग्रामपंचायत निवडणुका व गाव तिथे शाखा अभियान उपक्रमाचा आढावा (पक्ष बांधणी) घेण्यासाठी दि. ७ व ८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संगमेश्वर तालुक्यात झंझावाती दौरा पार पडला. या दौऱ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. 

मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, मनसे तालुकाध्यक्ष व नगरसेवक अनुराग कोचिरकर, मनविसे तालुका संपर्क अध्यक्ष दिनेश मांडवकर, देवरूख शहर अध्यक्ष सागर संसारे, मनविसे तालुकाध्यक्ष सिद्धेश वेल्हाळ, मनविसे देवरूख शहर अध्यक्ष ऋतुराज देवरूखकर, ॲड. अजय पाटील, नित्यानंद देसाई, शेखर पांचाळ, रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, महेश गुरव साहेब, नंदू फडकले, अजित गोरुले, प्रणील पडवळ, शांताराम दळवी, अमित रेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा तालुका दौरा मोठ्या उत्साहात पार पडला. 

या दौऱ्याप्रसंगी साखरपा विभाग मनसे शाखाध्यक्ष प्रितम नंदकुमार गोताड (पुर्ये), कौस्तुभ विश्वनाथ केतकर (कोंडगाव), निलेश दिलीप मोघे (मुर्शी), उपशाखाध्यक्षपदी रुपेश शिवराम घुमे (मुर्शी) नियुक्ती करण्यात आली. मोर्डे गावच्या महाराष्ट्र  सैनिकांनी मोर्डे येथे संगमेश्वर दौऱ्यात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

बामणोली गावचे मनसे शाखाध्यक्ष संतोष शिंदे यांची नियुक्ती तर उपशाखाध्यक्षपदी लहू मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. आंगवली गावातील महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधण्यात आला. कासारकोळवण गावचे केशव करंबेळे यांची शाखाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कासारकोळवण गावचे जेष्ठ महाराष्ट्र सैनिक तुकाराम तोरस्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

देवरुखमधील मनसे संगमेश्वर तालुका कार्यालयात देवरूख शहर पदाधिकारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. मनसे रिक्षा संघटना देवरूख विभाग यांच्या चिन्हांचे अनावरण करण्यात आले.ओझरेखुर्द जिल्हा परिषद गट विभाग अध्यक्षपदी अमित मनोहर रेवाळे यांची नियुक्ती करण्यात  आली. 

आंगवलीतील किशोर करंबेळे यांनी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत  मनसेत प्रवेश केला. भविष्यात होणाऱ्या ग्रामपंचायत  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंगवली मनसे शाखाध्यक्ष म्हणून किशोर करंबेळे यांची यावेळी  नियुक्ती  करण्यात आली. ताम्हाणे विभाग अध्यक्षपदी संजय शेलार यांची निवड करण्यात आली. 

आंबेडबुद्रुक शाखाध्यक्ष मनोज मोहिते, उपशाखाध्यक्ष राजेश पांचाळ, उपशाखाध्यक्ष विलास खापरे, संगमेश्वर शहर अध्यक्ष मनोहर कोळी, उपशहर अध्यक्ष मनोज चौगुले, शहर सरचिटणीस ओमकार लोध, शहर संघटक विशाल रापटे, कोळंबे- सोनगिरी शाखाध्यक्ष संदेश चव्हाण, नावडी उपविभाग अध्यक्ष राकेश शिगवण, उपतालुकाध्यक्ष महेश रमेश गुरव आदिंची मनसे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. या दौऱ्यानंतर तालुक्यात मनसे अधिक बळकट होईल, असे तालुकाध्यक्ष अनुराग कोचीरकर यांनी सांगितले. 

फोटो- संगमेश्वर तालुका मनसेच्या झंझावाती दौऱ्याची काही क्षणचित्रे.

Comments