कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून, परराज्यातून व कंपन्यांमध्ये येणा-या कामगारांवर लक्ष ठेवून राहणे गरजेचे

 २५ रोजीचा कार्तिकी उत्सव शांततेने, संयमाने साजरा करावा


उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहीती


रत्नागिरी प्रतिनिधी:-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजुनही आपल्याला सजग रहायचे आहे. अजुनही परराज्यातून, परजिल्ह्यातून येणारे नागरिक यांच्या लक्ष ठेवून त्यांच्या चाचण्या करुन घेणे आवश्यक आहे. कंपन्यांमध्ये बाहेरील राज्यातून येणारे लोक यांच्या देखील तपासण्या करुन घेतल्या पाहिजेत. शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेत असताना जिल्ह्यातील ३८०० शिक्षकांच्या कोव्हिड टेस्ट झाल्या. त्यामध्ये ७ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आगामी २५ रोजी आयोजीत कार्तिकी उत्सव शांततेने, संयमाने साजरा करावा असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.


Comments