छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर कार्यक्रमानुसार 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारांची प्रारुप यादी 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून सदर मतदार यादीवरील हरकती व दावे 17 नोव्हेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत सादर करता येणार आहेत. दावे व हरकती मंगळवार 05 जानेवारी 2021 पर्यंत निकाली काढण्यात येणार असून अंतिम मतदार यादी शुक्रवार 15जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
मतदार यादी अद्यावतीकरण करण्यासाठी पुढील नमुन्यांचा वापर करावा. मतदार यादीत नाव दाखल करणे-नमुना 6, अनिवासी भारतीयांचे नाव मतदार यादीत दाखल करणे-नमुना 6 अ, मतदार यादीतील नाव वगळणे-नमुना 7, मतदार यादीतील मतदाराचे तपशिलात दुरुस्ती करणे-नमुना 8, मतदाराचा निवास बदलल्यास विधानसभा मतदार संघातील मतदार यादी भाग बदलणे- नमुना 8 अ. हरकती व दावे सादर करण्याचे अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत.
त्याचप्रमाणे सदर दावे व हरकती या राष्ट्रीय सेवा पोर्टलवर (NVSP) ऑनलाईन सादर करता येतील. तरी सर्व नागरिकांनी या पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेवून रत्नागिरी जिल्ह्यातील मतदार यादी अचूक व सुदृढ होण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.

Comments
Post a Comment