रत्नागिरी जिल्ह्यातील दिपावलीच्या काळात कोव्हिड १९ च्या अनुषंगाने शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे

 


रत्नागिरी जिल्ह्यातील नागरीकांनी दिपावलीच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. शासानाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या नियमांचे पालन करावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा गावडे-फुले यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. मृत्यू दर देखील कमी होत आहे. मात्र नागरीकांनी सजग राहणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू अजुनही संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तंबाखू, सिगारेट आदींचे सेवन करु नये. 

तंबाखू, पान सुपारी खाऊन रस्त्यावर थुंकू नये.  बाजार पेठेत, मॉल्स, दुकाने, दवाखाने या ठिकाणी गर्दी होणार नाही याची प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी. असेही आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा गावडे-फुले यांनी केले आहे.

Comments