खेड आमदार योगेश कदम यांनी थोडे संयमाने वागावे, खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी लगावला टोला
खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे वारसाहक्काने निवडून आलेले आहेत. राजकीय व सामाजिक चळवळीतील त्यांना अनुभव नाही. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर हक्कभंग आणण्याची आवश्यकता नव्हती.
कोणताही शासकीय कार्यक्रम हे शासकीय अधिकारी किंवा शासकीय विभाग आयोजित करत असतात. त्यामुळे हक्कभंग आणायचं असेल तर शक्य विभागावर आणा. सुनील तटकरे हे खासदार आहेत. यांच्यावर हक्कभंग हक्कभंग आणणे हे कितपत योग्य आहे याबाबत योगेश कदम यांनी अभ्यास करावा. असा उपरोधिक टोला खेडच्या नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी लगावला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरीदेखील कोकणात शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची भूमिका ही विळा आणि भोपळा याप्रमाणेच राहिली आहे. राज्यात महाविकास आघाडी झाली असली तरी देखील कोकणातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ही आघाडी पसंत नाही. त्यामुळे कोकणातील सर्व निवडणुकांमध्ये महा विकास आघाडी होऊ शकत नाही असे खळबळजनक वक्तव्य खेड चे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या काळात हेड नगरपरिषदेने शहरासाठी कोव्हिड केअर सेंटर सुरू केले. तसेच अद्ययावत रुग्णवाहिका देखील आणण्यात आल्या. यासाठी अर्थमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशीही माहिती वैभव खेडेकर यांनी दिली आहे.

Comments
Post a Comment