जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, सिंचन भवन कार्यालयात भेट देऊन धरण प्रकल्पांचा घेतला आढावा




राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खनिकर्म राज्यमंत्री अदिती तटकरे व आमदार शेखर निकम यांनी रत्नागिरी जिल्हा दौ-याच्या दरम्यान वेळ देऊन रत्नागिरी पाटबंधारे मंडळ,  सिंचन भवन कार्यालयात नुकतीच भेट दिली. यावेळी रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील धरण प्रकल्पांचा आढावा घेतला. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत अधीक्षक अभियंता श्रीमती वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील व श्री. सलगर यांनी जंगी स्वागत केले. 

यावेळी अधिक्षक अभियंता श्रीमती वैशाली नारकर यांनी  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आढावा बैठकीत प्रकल्प निहाय, पुनर्वसन, सुप्रमा, उपलब्ध निधी,  कोंकणातील सिंचन विषयक अडचणी सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार शेखर निकम यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील धरणांच्या विकासाचे प्रश्न, पाणीटंचाईचे प्रश्न मांडून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली.




Comments