रत्नागिरी गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते यांनी जी.जी.पी.एस. शाळेला दिली भेट

 रत्नागिरी प्रतिनिधी:-

दिनांक २३ नोव्हेंबर रोजी गट शिक्षणाधिकारी श्रीमती सशाली मोहिते आणि विषय तज्ञ सौ.अश्विनी काणे यांनी शहरातील जी.जी.पी.एस.शाळेस भेट देऊन शाळा सुरु करण्यासंदर्भात पाहणी केली.

यावेळी मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांनी शाळा सुरु करण्याची पूर्ण तयारी केली असल्याचे सांगितले. सॅनिटायझर,  तापमान तपासण्यासाठी गन, ऑक्सिमिटर, साबण, हँडवॉश, सूचना फलक, वर्ग खोल्या, आवश्यक स्वच्छता, सुरक्षित अंतर, इत्यादी सर्व तयारी ठेवल्यामुळे गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते यांनी समाधान व्यक्त केले. पालक संमती पत्रे मिळाल्या नंतरशाळा सुरु होईल.

सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कोव्हिड-१९ चे  अहवाल निगेटिव्ह आहेत.

पालक सभा पूर्ण झाल्यानंतर संमती पत्रे येतील आणि शाळा सुरु होईल. यावेळी गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते यांनी शिक्षकांची  सभा घेऊन मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.



Comments