रत्नागिरी आलीमवाडी जमीन व्यवहाराला विरोध करण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार नागरीकांच्या पैशांचा अपव्यय होऊ नये हीच आमची भूमिका

 नागरीकांच्या पैशांचा अपव्यय होऊ नये हीच आमची भूमिका


भाजपा गटनेते व नगरसेवक समीर तिवरेकर यांची प्रतिक्रिया


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी शहरातील वादग्रस्त आलीमवाडी जमिन खरेदी व्यवहाराला आम्ही कडाडून विरोध केलेला आहे. सभागृहात हा ठराव झालेला असला तरी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. नागरीकांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये हीच आमची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया भाजपा गटनेते व नगरसेवक समीर तिवरेकर यांनी व्यक्त केली आहे. 

आलीमवाडी येथे पाण्याची टाकी उभारण्यासाठी तब्बल एक कोटी सत्तावीस लाख रुपयांना जमीन खरेदी करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात एवढा जमिनीचा दर अद्याप नाही. त्यामुळे सुमारे चार गुंठे जमीन क्षेत्रासाठी एवढी किंमत नगर परिषदेने का मोजावी?, हा जनतेचा पैसा आहे. आणि या पैशाचा आम्ही अपव्यय होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया समीर तिवरेकर यांनी व्यक्त केली आहे.

Comments