रत्नागिरी जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल


दिवाळीच्या तोंडावर रत्नागिरी जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात केवळ 89सक्रिय रुग्ण आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या शंभराच्या खाली आल्याने आता रत्नागिरी जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे मानले जात आहे. 

चिपळूण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या कामथे कोविड रुग्णालयात 10, लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये5, श्री हॉस्पिटलमध्ये 1असे 16 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 8 हजार 498 पॉझिटिव्ह रत्नागिरी जिल्ह्यात आढळले होते. त्यातील 7 हजार 983 बरे झाले. जिल्ह्यात कोरोनामुळे 317जणांचा मृत्यू झाला आहे.

Comments