रत्नागिरी जिल्हा दौ-यावर येणारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील धरणांचे आणि पाणीटंचाईचे प्रश्न सोडवणार का?
राज्याचे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील शनिवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मात्र दौ-यावेळी जिल्ह्यातील धरण प्रकल्पांचे व पाणीटंचाईचे प्रश्न सोडवणार का असा सवाल जिल्हावासियांमधून उपस्थीत केला जात आहे.
जलसंपदा विभागाच्या वतीने तसेच कोकण पाटबंधारे विभागाच्या वतीने अनेक धरणे उभारण्यात आली आहेत. मात्र या धरणांपासून शेतक-यांना आणि धरण प्रकल्प भागातील ग्रामस्थांना किती फायदा होतो हा मोठा प्रश्न आहे. शनिवार पासून जयंत पाटील रत्नागिरी दौ-यावर आहेत.
मात्र चिपळूण व रत्नागिरी तालुक्यातच त्यांचा हा दौरा आहे. उर्वरित अन्य तालुक्यात त्यांच्या दौ-याचे नियोजन नाही. तिवरे धरण अपघातासंदर्भात त्या भागातील ग्रामस्थांना काय मिळणार हा देखील प्रश्न आहे. राजापूर, लांजा, साखरपा, संगमेश्वर या भागात दौरा कधी करणार हा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे
शनिवार 07 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता इस्लामपूर जि. सांगली येथून मोटारीने सावर्डे येथे आगमन व राखीव. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुढील तालुकानिहाय बैठकांना उपस्थिती (स्थळ: कै. गोविंदराव निकम सभागृह, मु.सावर्डे, ता.चिपळूण जि. रत्नागिरी).
सकाळी 11 वाजता चिपळूण तालुका, सकाळी 11.30 वाजता गुहागर तालुका, 12 वाजता खेड तालुका, 12.30 वाजता दापोली तालुका, दुपारी 1 वाजता मंडणगड तालुका, दुपारी 1.30 वाजता संगमेश्वर तालुका, दुपारी 2.00 ते 2.30 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता सावर्डे येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.00 वाजता पत्रकार परिषद. (स्थळ: शासकीय विश्रामगृह रत्नागिरी). राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकानिहाय बैठकांना उपस्थिती. (स्थळ: शासकीय विश्रामगृह रत्नागिरी).
सायंकाळी 4.30 वाजता रत्नागिरी तालुका, सायंकाळी 5.00 वाजता राजापूर तालुका, सायंकाळी 5.30 वाजता लांजा तालुका, सायंकाळी सोईनुसार मोटारीने गणपतीपुळेकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह गणपतीपुळे येथे आगमन व मुक्काम.
रविवार 08 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 7.30 वाजता मोटारीने गणपतीपुळे जि. रत्नागिरीहून ओरोस जि. सिंधुदूगकडे प्रयाण.

Comments
Post a Comment