चोर सोडून संन्याशाला फाशी..
रत्नागिरी शहरांमध्ये कोरोना ने त्रस्त झालेल्या छोट्या छोट्या व्यावसायिकांनी आपले छोटे छोटे धंदे सुरू केले आहेत ज्यांनी मोठेमोठे अनधिकृत गाळे उभारले त्यांच्यावर कारवाई न करता रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या या लोकांवर कारवाई करणार हे नगरपालिकेचे महापाप आहे.
स्वतः अनधिकृत गाणे उभे करायचे फळवाले यांच्याकडून हप्ते घ्यायचे आणि छोट्या लोकांना त्रास देऊन पुन्हा त्यांच्याकडून हप्ता ठरवून त्यांना परवानगी द्यायची हे खेळ आता जुने झालेत. आधी मोठे मासे पकडा मग छोट्या माशांना हात घाला अन्यथा रत्नागिरीकरांना रस्त्यावर उतरावे लागेल..
ही कारवाई करताना नगरपालिकेने नोटिस दिली का या सर्वांच्या कडून टॅक्स पण घेतो का त्या गोष्टीची शहानिशा होणे गरजेचे आहे
Comments
Post a Comment