माहेर संस्थेत निराधारांची भाऊबीज साजरी


हातखंबा व कारवांचीवाडी रत्नागिरी येथील माहेरी संस्था निराधारांसाठी काम करत असून संस्थेमध्ये निराधार महिला व निराधार पुरुष दाखल होत असतात. वर्षातील सगळे सण समारंभ मोठ्या उत्साहात याठिकाणी साजरे होतात. माहेर संस्थेत या वर्षीची भाऊबीज मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. 

माहेर स्नेहसदन हातखंबा येथील निराधार महिलांनी माहेर संध्याहाेम कारवांचीवाडी रत्नागिरी येथील निराधार पुरुषांना काैटूंबिक वातावरणात औक्षण करून व भेटवस्तू देऊन या वर्षाची भाऊबीज साजरी केली. या क्षणाने  निराधारांच्या चेह-यावर आनंद  फुलला.या आनंदी  क्षणांचे साक्षीदार हाेण्याचे भाग्य मिळाले अशी भावना माहेर संस्थेचे अधिक्षक, सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे यांनी व्यक्त केली.

Comments