रत्नागिरीत युवा सेनेच्या माध्यमातून दिपावलीच्या औचित्याने किल्लोत्सव स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना व टीम जिनियस यांच्या संयुक्त विद्यमाने १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीसाठी रत्नागिरी तालुका मर्यादीत किल्लोत्सव स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
या स्पर्धेत प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. स्पर्धेमध्ये प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका आगाऊ भरणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतीम तारिख १२ नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यामुळे या स्पर्धेत सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment