तोतया वकिलाकडून अल्पवयीन मुलीची दीड लाखांची फसवणूक

 रत्नागिरी: वकील असल्याची बतावणी करत नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची सुमारे १ लाख ५५ हजार ७५० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दोन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश चहल (रा. गुजरात) आणि अन्य एकजण या दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात वैभवी दामोदर लिमये (१७. रा.धवल कॉम्पलेक्स, जुना माळनाका, रत्नागिरी) हिने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार योगेश चहलने वैभवीच्या मोबाईलवर फोन करून मी वकील बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर आयु. क्यू. कंपनीची लिंक पाठवून नोकरीचे आमिष दाखवून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली आपल्या खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वैभवीने ४ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १ लाख ५५ हजार ७५० रुपये भरले. मात्र, त्यानंतरही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वैभवीने शहर पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

Comments