रत्नागिरीत अनैतिक प्रवृत्तींपासून दक्ष राहण्यासाठी दक्षता जनजागृती सप्ताह

 


सार्वजनिक व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड आहे. असा जो विचार केला जातो तेवढया प्रमाणात प्रत्यक्षात भ्रष्टाचार अस्तित्वात नाही याबद्दल सर्वाना आश्वासित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश आनंद सामंत यांनी दक्षता जनजागृती सप्ताह अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. 

सदरचा कार्यकम हा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विदयमाने शासनाच्या सर्व विभागांसाठी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला सहाययक सरकारी अभियोक्ता श्री. ए. ए. फणसेकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप पोलिस अधिक्षक नितीन विजयकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायदयातील तरतूदी तसेच

सुधारणा अधिनियम २०१८ यातील विशेष तरतुदींबद्दल उपस्थितांना माहिती दिली. सदर कायदयाच्या तरतुदीनुसार लाच देणा-या व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई करता येते. त्याचप्रमाणे खाजगी फिर्याद न्यायालयात दाखल करता येते याबाबत तरतुदींवर त्यांनी मार्गदर्शन केले. 

सुधारित कार्यान्वये अशा शासकीय कार्यालयातील आरोपींसंदर्भात गुन्हा नोंद करण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीत वरिष्ठांनी संमती देणे अथवा खोटी तक्रार असल्यास नाकारणे बंधनकारक आहे आणि तशी परवानगी त्या कालावधीत परवानगीबाबत निर्णय न घेतल्यास त्या संबंधित वरिष्ठांवर खातेनिहाय चौकशी, खटला दाखल करता येउ शकतो अशी विशेष सुधारणा करण्यात आलेली आहे, याबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव यांनी आपले विचार व्यक्त करताना काही महत्त्वाच्या वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्या. जे प्रामाणिकपणे कामकाज करणारे अधिकारी आहेत त्यांनी आपण स्वत:च एकटे प्रामाणिक आहोत आणि इतर सर्व भ्रष्ट आहेत असा अभिप्राय धारण करू नये. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराची मानसिकता असलेल्यांनी सर्वजण भ्रष्टाचारी आहेत. 

त्यामुळे आपण स्वतः भ्रष्टाचारी आहोत यात काही गैर नाही अशी समजूत करून घेउ नये. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या स्वरूपाबाबत आणि विस्ताराबाबत सर्वत्र चुकीच्या संकल्पना निर्माण होतात. असे विचार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव यांनी व्यक्त केले.



Comments