अत्याचारीत मुलींची हेल्प फौंडेशनने केली सुटका चिपळूण पोलीसांची तातडीची कारवाई
चिपळूण :पश्चिम बंगालहून फसवून आणलेल्या व गेले दोन महिने वेश्याव्यवसायच्या खाईत लोटल्या गेलेल्या दोन मुलींची हेल्प फौडेशनने चिपळूण पोलीसांच्या मदतीने थरारक सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलीसांनी एक पुरुष व महिलेला ताब्यात घेतले आहे.खेर्डी येथे या दोन मुलींना पश्चिम बंगालहून नोकरी लावतो असे सांगून गोड बोलून आणण्यात आले होते. यातील एका मुलीचे वय अवघे १६ वर्षे आहे. या दोघीना नंतर मारहाण, धमक्या देत गेले दोन महिने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. या संदर्भात हेल्प फौडेशनचे अध्यक्ष सतीश कदम यांच्याकडे माहिती येताच त्यांनी तातडीने खेर्डी येथे सदर मुलींची भेट घेतली व यावेळी संस्थेचे सदस्य श्रीधर भुरणही होते. या दोन्ही मुलींनी आपल्यावरील शारीरीक व मानसिक अत्याचाराची कहाणी सांगितली. त्यानंतर सतीश कदम यांनी त्यांना धीर व विश्वास दिला व तेथूनच पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांना या गंभीर प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनला बैठक होवून या रेस्कू ऑपरेशनची तयारी झाली.यात असि.पो.इन्सपेक्टर वर्षा शिंदे, पीएसआय सागर चव्हाण, पो.कॉ. आरती चव्हाण,पंकज पाडाळकर, व आशिष भालेकर ही टीम साध्या वेषात व खाजगी गाडीने खेर्डीकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत हेल्प फौंडेशनचे पदाधिकारी होते. सर्वात आधी संशयित आरोपींना पकडायचे ठरले कारण सतीश कदम यांनी ज्यावेळी जावून आले त्यानंतर तो संशयित मुलीना मारहाण करून धमकी देवून आला होता व मोबाईल ही काढून घेतला होता. तो कदाचित पसार होण्याची शक्यता होती.त्यामुळे सापळा रचून त्याला बेसावध ठेवून पकडण्यात आले. तो पर्यंत फौडेशनचे सदस्य दीपक शिंदे यांच्या कार मध्ये त्या दोन मुलीनाही घेण्यात आले व या सर्वांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले व अशा पध्दतीने हा मोठे रॅकेट हेल्प फॉउंडेशन व चिपळूण पोलीसांनी संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन करून उध्दवस्त केले. माञ या रॅकेटची व्यापकता मोठी असावी, अशी शक्यता आहे.
Comments
Post a Comment