जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ.बी.एस.कमलापूरकर यांनी राजापूरातील जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली सदिच्छा भेट
मंगळवार दि.3 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. कमलापूरकर यांनी राजापूर तालुक्यातील जवळेथर प्राथमिक आरोग्य केन्द्राला भेट दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साबळे व डॉ. गायकवाड वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.
उपस्थित अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचा सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व करोना बाबतीतचा आढावा घेण्यात आला. कामकाज बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अधिकारी कर्मचारी यांचे निवासस्थान, परिसर पाहणी करून निवास्थान दुरुस्ती बाबतीत पत्र व्यवहार, पाठपुरावा करणेबाबत सूचना दिल्या.



Comments
Post a Comment