रत्नागिरी जिल्ह्यातील हातपाटी वाळू व्यावसायिकांचे प्रश्न महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मांडणार कॉंग्रेस नेत्या सौ.हुस्नबानू खलिफेंचे आश्वासन


रत्नागिरी जिल्ह्यात हातपाटी वाळू व्यावसायिकांचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. वाळू उत्खनन परवानगी घेत असताना शासकीय कामातील अडचणी, वाळू वर बसवण्यात येणारी रॉयल्टी, मेरिटाईम बोर्ड बाबतच्या अनेक अडचणी आदि संदर्भात कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील काही हाथपटी वाळू व्यावसायिकांनी आपली कैफियत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी विधान परिषद आमदार अड. हुस्नबानू खलिफे यांच्याकडे मांडल्या.

सन २०१९-२० या साला करिता हातपाटीचा रॉयल्टीचा दर ३०१७/- रुपये एवढा होता. दर पडवडणारा नसल्याने त्या काळात देखील कुणीही परवाना घेतला नव्हत्या. त्यामुळे राज्य सरकार चा महसूल चे नुकसान झाले त्याच बरोबर जिल्ह्यातील हाथपटी व्यवसायावर अवलंबून असलेल्याचे रोजगार बुडाले. 

२०१९-२०२० मध्ये हाथपा टी व्यावसायिकांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तरी या वर्षी २०२०-२०२१ सालाकरिता रॉयल्टी वाढवून  दर ३४७०/- रुपये करण्यात आला आहे, या व्यतिरीक्त या वर अन्य कर व मेरिटाईम बोर्डची फी आकारली जाणार आहे, हा दर व्यावसायिकांना पडवरणारा नाही, या मुळे जिल्ह्यातील हातपटी वाळू व्यावसायिक देशोधडीला लागतील तरी हा दर कमी करुन ५०० रुपयांपर्यंत करावा, रॉयल्टी भरताना किमान १००० ब्रासची मर्यादा अट आहे ती कमी करुन २०० ब्रास पर्यंत करावी अशा विविध मागण्या हारिस शेकासन यांनी यावेळी सौ. हुस्नबानू खलिफे यांच्याकडे केल्या. यावेळी सौ.हुस्नबानू खलिफे म्हणाल्या की मी स्वत: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे या सर्व समस्या मांडणार असून यावर लवकरात लवकर निर्णय होईल असे आश्वासन दिले.

Comments