रत्नागिरी आलिमवाडी जमीन खरेदीबाबत नगराध्यक्ष बंड्या साळवींना सभागृहात आले यश
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी शहरातील आलीमवाडी येथील जमीन खरेदीबाबत नगराध्यक्ष बंड्या साळवी यांना सभागृहात यश आले आहे. गुरुवारी पार पडलेल्या सर्वसाधारण बैठकीत तब्बल २२ नगरसेवकांनी या व्यवाहाराबाबत सकारात्मक पाठिंबा दर्शवला. तर ६ भाजप नगरसेवक व १ राष्ट्रवादी नगरसेवक यांनी या व्यवहाराला विरोध केला.
रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेंतर्गत आलीमवाडी येथे पाण्याची टाकी उभारण्यासाठी जमीन खरेदी करण्याची आवश्यकता होती. मात्र त्यासाठीची रक्कम तब्बल १ कोटी २७ लाख एवढी किंमत मोजावी लागणार होती. यावरूनच राष्ट्रवादी आणि भाजपने कडाडून विरोध केला आहे. मात्र यासाठी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांना सभागृहात २२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला असून तसा ठरावही झाला आहे.
Comments
Post a Comment