डीजीके वाणिज्य शाखेत दिव्या चौधरी,सेजल वारिशे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100% लागला आहे.अकाऊंटन्सी या मुख्य विषयात 456 गुण ( 76%) गुण मिळवून दिव्या चौधरी पहिली आली आहे. मुळ दापोली येथील वाणिज्य शाखेचे जेष्ठ शिक्षक श्री हरिप्रसाद लढ्ढा यांनी ठेवलेले कै अयोध्या शिवालाल लढ्ढा पारितोषिक प्राप्त झाले आहे.
तसेच बिझनेस मॅनेजमेंट हा मुख्य विषय घेऊन सेजल वारिशे ही 428 गुण (71%) गुण मिळवून प्रथम आली आहे.या विद्यार्थ्यांना उपप्राचार्या सौ निलोफर बन्नीकोप,सौ राखी साळगांवकर ,सौ मधुरा पाटील, प्रा वैभव कीर यांनी मार्गदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव सुनिल उर्फ दादा वणजू,संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे कार्यकारणी सदस्य विश्वनाथ शिंदे प्राचार्य सीएमए प्रा उदय बोडस, पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे,सर्व प्राध्यापक वर्ग व सर्व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment