रत्नागिरी शहरात रहदारी वाढली


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागल्यानंतर आता रत्नागिरीकर घराबाहेर पडू लागले असून दिवाळी सणाच्या खरेदीसाठी गर्दी केल्याने शहर परिसरात रहदारी वाढ लागली आहे. संध्याकाळी मारुती मंदिर, माळनाका, गोखले नाका येथे रहदारी वाढू लागल्याने वाहतूक नियंत्रकांना घटनास्थळी हजर राहावे लागत आहे. बाजारपेठ, रामनाका परिसरातही खरेदी करण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. शहरात गर्दी झाल्याने वाहने पार्कीग करण्याची समस्या वाढू लागली.

Comments