रत्नागिरी जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशनच्या आंदोलनाला माजी खासदार निलेश राणे यांनी दिला पाठिंबा
ऑल इंडिया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन नवी दिल्ली संलग्न ऑल महाराष्ट्र डिलर्स ऑर्गनायझेशन यांच्या अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशनच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. तसेच या औचित्याने टी.आर.पी. येथील अंबर हॉल मध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भाजपा नेते निलेश राणे यांनी सभेत सहभागी होऊन पाठिंबा दिला.
कोरोना महामारीमुळे देश व देशाअंतर्गत व्यावसायिकांना मोठया आर्थिक आडचणीला सामोरे जावे लागत आहे . त्या अंतर्गत सामाजिक , वैवाहिक , धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली . त्यामुळे टेन्ट , मंडप , कॅटरिंग , मंगल कार्यालय , बॅक्वेट हॉल , डि.जे. , साऊंड , लाईट , डेकोरेशन , इव्हेंट व्यवस्थापक , इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रातील असोसिएशनच्या माध्यमातून अनलॉक प्रक्रियेमध्ये हॉल, मंडप उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी विविध निवेदने सुद्धा सरकारकडे देण्यात आली. मात्र त्यानंतरही शासनाकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने राज्यभरात मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स चालक मालक धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सहभागी झालेले निलेश राणे म्हणाले आम्ही तुमच्या आंदोलनात सहभागी आहोत. कोणत्याही प्रकारे तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला भाग पाडू. तसेच केंद्र सरकारच्या वतीने देखील प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अमरेश सावंत, विजय शिर्के, दिनेश गुरव, राजन कोकाटे, नितीन शिंदे, अभिजित गोडबोले, सुहास ठाकूरदेसाई, नंदकिशोर चव्हाण आदी उपस्थीत होते.



Comments
Post a Comment