रत्नागिरी शहरातील रस्त्यावर बसणा-या भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्यावर मंगळवारपासून होणार कारवाई
नगरसेवक राजन शेट्ये यांनी सर्वसाधारण सभेत मांडला प्रस्ताव
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, फूटपाथ या ठिकाणी अनेक फळ विक्रेत्यांच्या गाड्या आहेत. तसेच भाजी विक्रेते, घरगुती साहित्य विक्रेते देखील बसतात. त्यामुळे पादचा-यांना मोठी अडचण होते. रस्त्यावरच बसतात. त्यामुळे अनेक वेळा वाहतुकीला देखील अडचण निर्माण होते. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना गटनेते, नगरसेवक राजन शेट्ये यांनी गुरुवारच्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत केली. रत्नागिरी शहरातील अनेक नागरीकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजन शेट्ये यांनी केली. मात्र छोटे भाजी विक्रेते जे काही ठराविक वेळेतच भाजी विक्री करुन आपापल्या गावात जातात. त्यांच्यावर कारवाई होता कामा नये. असा प्रस्ताव राजन शेट्ये यांनी मांडला. या प्रस्तावावरुन नगराध्यक्ष बंड्या साळवी म्हणाले सुरुवातील रिक्षा फिरवून अशा भाजी, फळ विक्रेत्यांना सुचना देण्यात येतील. त्यानंतर पोलिस सुरक्षा घेऊन मंगळवार पासून कारवाई करण्यास सुरुवात होईल. पादचारी किंवा नियमित वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ नयेत या हेतूनेच ही भूमिका घेण्यात येत आहे. अशी माहीती राजन शेट्ये यांनी दिली.
Comments
Post a Comment