फणसवळे गावात बिबट्याचा मुक्त संचार
संगमेश्वर तालुक्यातील फणसवळे गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. यासाठी ग्रामपंचायतीने वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. गावातील बौध्दवाडी, मोर्डे करडवाडी व गावठाण याठिकाणी गेली अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. पाळीव जनावरांवर हल्ला करीत आहेत.
यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. यासाठी ग्रामपंचायतीने हे निवेदन वनपाल सुरेश उपरे यांना दिले आहे. निवेदनानुसार उपरे यांनी ग्रामस्थांची मागणी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवली आहे. येथील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, बिबट्याचे दर्शन घडल्यास वन विभागाला कळवावे, वन विभाग तत्काळ कार्यवाही करील, अशी ग्वाही दिली.

Comments
Post a Comment