रत्नागिरी बेकायदा जुगार चालविणाऱ्या दोघांवर कारवाई


रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे आणि चर्मालय येथील चौकात बेकायदा जुगार चालवणार्‍या अमोल सखाराम पेंढारी (28,रा.वैभवरत्न अपार्टमेंट,रत्नागिरी)आणि संदेश बापू गावदाने (45,रा.चर्मालय,रत्नागिरी) विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 6,665 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी आणि बुधवारी सायंकाळी करण्यात आली. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

Comments