संगमेश्वर कलंबस्ते परिसरातील प्रदेशिक नल पाणी योजना गेले ६ दिवस बंद
संगमेश्र्वर :- संगमेश्वर कलंबस्ते व आसपासच्या परिसरातील असलेली प्रादेशिक नल पाणी योजना गेल्या ६ दिवसापासून बंद आहे पण या प्रादेशिक नल पाणी योजनेकडे कोणतेही अधिकारी लक्ष सुद्धा टाकत नाही आहेत त्यामुळे येथील ग्रामस्थांचे खूप हाल होत आहेत. त्यांना पिण्याचा पाण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. मात्र पाणी पट्टी वसूली करायला ग्रामपंचायतीचे कर्मचारी वेळेत गवा गावात सारखे पाणी पट्टी वसूली करण्यासाठी फिरत असतात परंतु कलंबस्ते व इतर आसपासच्या गावामध्ये पानीच वेळेत पोचत नाही आहे. याकडे प्रादेशिक नल पाणी योजनेतील कर्मचारी काम करत असताना विचारणा केली असता कधी पंपाचा तर कधी स्टाटर चा अशे अडचणी सारखे येतात अशी कारणे सारखे देत असतात परंतु कलंबस्ते परिसरातील असलेली प्रादेशिक नल पाणी योजनेकडे अद्याप कोणता ही अधिकारी फिरुकुन सुद्धा बघत नाही आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वण वण करावे लागत आहेत. प्रादेशिक नळ पाणी योजना बंद असलायुमेले येथील ग्रामस्थांना खूप जास्त अडचणी सहन कराव्या लागत आहेत. सारखे सारखे प्रादेशिक नल पाणी योजना बंद होत असल्यामुळे कलंबस्ते,आंत्रवली व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थ अक्षरशः संतापून गेलेले आहेत. तरी येथील ग्रामस्थ मागणी करीत आहेत की प्रादेशिक नल पाणी योजनेकडे सर्व वरिष्ठांनी व संबंधितांनी वेळेवर लक्ष घालून ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावी अशी मागणी कलंबस्ते व आसपासच्या परिसरातील रहिवाशी करीत आहेत.
Comments
Post a Comment