संगमेश्वर कसबा येथे विद्युत वाहीणी जोडत असता शाॅक लागल्याने वायरमनचे निधन

  काम चालुअसता स्ट्रीट लाईट अज्ञात ईसमाने चालुकेल्याने शाॅक लागुन वायरमनचे निधन !


◾ सायंकाळी सहाची घटना ,वायरमनच्या निधनाने संगमेश्वरवर दुःखाचे सावट!


✒️ सत्यवान विचारे ,संगमेश्वर .


👉

  अाज सांयकाळी सहाच्या सुमारास विद्यृत कनेक्शन करण्यास चढला असता अचानक कोणा अज्ञात ईसमाने विजपुरवठा सुरु केल्याने  कसबा फिडरचे वारमन श्री, नरेंद्र  विष्णु डावल वय सुमारे २८ रा,गाव मळा संगमेश्वर ,यांचे दुरदैवी अपघाती निधन झाले. 



    ◾कसबा पाररकर वाडा येथील झाडे तोडण्यासाठी सकाळी ९वाजता विज पुरवठा बंद करण्यात अाला होता .

   सांयकाळी चारवाजता चार झाडे तोडल्यावर पून्हा विद्युत तारा जोडण्याचे काम चालु झाले ,सांयकाळी सर्व लाईन ओढून झाल्यावर पोलवर कनेक्शन करण्यासाठी कसबा फिडरचे मेस्री श्री.अशोक माने ,महेंद्र होडे ,सूरज गोवळकर अाणि वायरमन नरेंद्र विष्णू डावल असे चौघे काम करित होते ,कनेक्शन करण्यासाठी नरेंद्र पोलवर चढून कनेक्शन करित असता कसबाालेंडी येथू स्ट्रीट लाईट कोणा अज्ञात ईसमाने चालु केल्याने  नरेंद्र याला जबरदस्त शाॅक लागल्याने तो जोरात ओरडला व पोलवर चिकटुन राहीला ,

    सर्वत्र अारडा ओरडा झाल्याने तात्काळ विद्यृत पुरवठाृबंद करुन ईतर वायरमन यांनी नरेंद्र याला खाली ऊतरले असता त्याचे निधन झाल्याचे दिसुन अाले .


विज पुरवठा कोणी सुरु केला याचाृशोध सुरु असुन संगमेश्वर पोलिसठाण्यात अाकस्मिक मृत्युची नोंद झाली असुन अधिक तपास संगमेश्वर स्थानकाचे पो,नि.श्री,ऊदय झावरे करित अाहे , 

  कसाबा येथिल वायरमचे दुरदैवी  निधन झाल्याचे कळताच संगमेश्वर वरती दुःखाची शोककळा पसरली अाहे .

Comments