मासेमारी व्यवसायासमोर आता जेलिफिशचे संकट


ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह वादळसदृश्य हवामानाने मच्छीमारीला ब्रेक लागला होता. या परिस्थितीतून सावरणार्‍या रत्नागिरी तालुक्यातील मच्छीमारांपुढे जेलीफिशचे संकट उभे ठाकले आहे. गेले आठवडाभर 10 वावापर्यंत मासेमारी करणार्‍या मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत, मात्र खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणार्‍या ट्रॉलिंग, पर्ससिननेटद्वारे मासेमारी करणार्‍यांना सरंगा, बांगडा, सुरमई मिळत आहे. 

मिर्‍या, काळबादेवी, गणपतीपुळे, जयगड या भागात मोठ्याप्रमाणात जेलीफिश सापडत आहेत. झुंडीने असलेले जेलीफिश माशांवर तुटून पडतात. त्यांच्या भितीने मासा किनारी भागातून गायब झाला आहे. जेलीफिश जाळी फाडत असल्याने नुकसाने होते.

Comments