मुलांना शाळांमध्ये पाठवण्याची सक्ती नाही; आरोग्य विषयक सर्व नियमांचे शाळांकडून पालन होणे आवश्यक

 रत्नागिरी जिल्हा शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर यांनी रा.भा शिर्के प्रशाला व अ.के.देसाई हायस्कूल शाळांना दिली भेट

सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे असले तरी देखील मुलांना शाळेत पाठवण्याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा पालकांचाच राहील. शाळेच्या परिसरात व वर्ग खोल्या सॅनिटाईझ करणे अनिवार्य आहे. आरोग्याच्या सर्व नियमांचे, शासन निर्णयाचे पालन शाळांकडून झाले पाहिजे अशा सुचना रत्नागिरी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नंदिनी घाणेकर यांनी दिल्या.  

रत्नागिरी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नंदिनी घाणेकर व जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती निशादेवी वाघमोडे यांनी शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रा.भा.शिर्के प्रशाला, मराठा मंदिर अ.के.देसाई हायस्कूल आदी शाळांना भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या आदी ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. ऑनलाईन शिक्षण कशा पद्धतीने दिले जात आहे याबाबत देखील आढावा घेण्यात आला. यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




Comments