पं.स.माजी सदस्य सुरेश उर्फ नाना कांगणे यांनी आभार व्यक्त करत डॉ. दौंड यांचा केला सन्मान
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील वास्तव्य असलेले तसेच माखजन पंचक्रोशीतील लोकप्रिय कार्यकर्ते व चिपळुन संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.शेखरजी निकम यांचे अत्यतं निकटवर्तीय असलेले कार्यकर्ते माजी पं.स.सदस्य सुरेश उर्फ नाना कांगणे यांना कोविड-19 काळात कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे आढळल्याचे निदर्शनास येताच संगमेश्वर ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी दौंड यांच्याशी संपर्क साधला असता डॉ. तानाजी दौंड यांनी श्री.कांगणे यांचे मानसिक प्राबल्य वाढवून स्वतःच्या देखरेखीखाली औषधोपचार व सुश्रुषा करून श्री.कांगणे यांना कोरोना प्रादुर्भावापासुन मुक्त केले.
श्री.कांगणे कोरोना प्रादुर्भावातुन मुक्त झाल्याचे कळताच माखजन पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.भावनाविवष व भावनिक झालेल्या कार्यकर्त्यांनी १नोव्हेंबर सकाळी१० वा.संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. दौंड यांची भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान केला.
या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री.विवेक शेरे यांच्या हस्ते डॉ. दौंड यांना शाल श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले असुन माजी जि.प.सदस्य श्री.दिपक जाधव, आरवली उपसरपंच निलेश भुवड, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप सोलकर, सौ.श्वेता कांगणे,युवक जिल्हा उपाध्यक्ष सुशिल भायजे, समिर लोटणकर, प्रविण भुवड, मंदार मते, सुरेश ओक्टे,उल्हास काणेकर,सुनिल भुवड,अक्षय चव्हाण,संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.वहाब दळवी व संगमेश्वर ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव श्री. उदय पवार उपस्थित होते.

Comments
Post a Comment