दानवाड येथे कै.रावसाे अंबुपे सहकारी दुध संस्थेच्या वतीने दुध उत्पादकांना लाभांश व भेटवस्तू वाटप


नवे दानवाड (ता.शिरोळ) येथील कै.रावसो कृष्णा अंबुपे सहकारी दुध उत्पादक संस्थेच्या वतीने दुध उत्पादक सभासदांना लाभांश व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. दिपावली निमित्त दुध संस्थेच्या वतीने ०१-०४-२०१९ ते ३१-०३-२०२० या काळात दुध पुरवठा करणार्या सभासद व दुध उत्पादकांना (दुध फरक बोनस) म्हैस दुध- शेकडा ८ रू.६७ पैसे व गाय दूध- शेकडा ६ रू.७७ पैसे अशा प्रमाणात लाभांश वाटप करण्यात आले आहे. 

यामध्ये एकूण १५ लाख ७१ हजार ५५४ रूपये इतकी मोठी रक्कम अंबुपे दुध संस्थेच्या वतीने दुध उत्पादकांना मिळाली आहे. या लाभांश व भेटवस्तूचा लाभ ६४० दुध उत्पादकांना झाला आहे. या लाभाच्या वाटपाप्रसंगी संस्थेचे चेअरमन सचिन अंबुपे, विद्याधर तिप्पाण्णावर, रफिक देसाई, शिवू पाटील, रमेश कांबळे, अनिल बेरड, संजय तिप्पाण्णावर, अजित तेरदाळे, ज्ञानसिंग रजपूत, महादेव चव्हाण, समगोंडा पाटील, रावसो बेरड, विठ्ठल आंबी तसेच सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, सर्व दुध उत्पादक सभासद आणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments