गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक आठ बैलांसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

 राजापूर:अणुस्कुरा घाटमार्गे अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारी गाडी अणुस्कुरा चेक पोस्टवरील पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून गुरांची वाहतूक करणारी सुमारे दीड लाखाची बोलेरो गाडी आणि सुमारे नव्वद हजाराचे बैल असा दोन लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दि. २४ नोव्हेंबर पहाटे साडेपाचच्या दरम्यान एमएच ०९ एल ८६९४ या क्रमांकाची पांढरी बोलेरो गाडी परटवली येथून मुरगूड येथे निघाली होती. त्यात आठ बैल होते. जयदीप अशोक वाघरे (रा. तिसंगी, गगनबावडा, कोल्हापूर) आणि तरबेज चांदमियाँ ठाकूर (रा. परटवली, राजापूर) या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Comments