उक्षी बनाची वाडी जाणाऱ्या रस्त्यावरील जगलं तोडीच्या कामाला सुरवात रमजान गोलंदाज यांच्या प्रयत्नला यश

 रत्नागिरी प्रतिनिधी 

             उक्षी बनाचीवाडी रस्ता हा गणपतीपुळे येथे शॉटकट जाणारा रस्ता असून उक्षी गावातील अर्था गाव बनाचीवाडी येथे आहे. त्यांना आपल्या वाडीत जाण्यासाठी याच जंगलातून बनाचीवाडी येथे जावे लागत होते त्यावर वाढलेले जंगल हे त्रास दायक होते. ते जंगल साफ करा अशी मागणी गेली अनेक दिवस नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी लावून धरली होती. अखेर जि. प. प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी या रस्त्यावर आलेले जंगल तोडण्याचे काम हाती घेतले आहे. 

         उक्षी बनाची वाडीला रस्ता हा जंगल आणि झाडा झुडपानी वेडून घेतला होता  कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकला असता. उक्षी बनाची वाडीला जाणारा हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम रत्नागिरी यांच्या एकत्यारीत येत असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जगलं झाले असून गाडी चालवने कठीण झाले होते. या रस्त्यावर मोठं मोठी असणारी वळने आणि त्यात हे वाढलेले जंगल हे मृत्यू ला निमंत्रण देणारे ठरु शकत होते. याचा विचार करून ती साफ करणे गरजेचे होते त्याप्रमाणे जि. प. रत्नागिरी बांधकाम विभागाने तो रस्ता साफ सफाई करण्यास सुरवात केल्याने रमजान गोलंदाज यांनी बांधकाम विभागाचे आभार मानले.



Comments