राजापूर तालूक्यातील इयत्ता ९ वी ते १२ च्या २७ शाळांमध्ये शुक्रवारी तब्बल ९०२ विद्यार्थी संख्या
रत्नागिरी प्रतिनिधी:-
शासनाने इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे का नाही पाठवायचे याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र राजापूर तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंकी यांनी विशेष बाब म्हणून तालुक्यातील प्रत्येक शाळा, माध्यमिक विद्यालयात शासनाने निर्देशीत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे अशा सक्त सुचना दिल्या आहेत. शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी मागवलेल्या अहवालानुसार राजापूर तालुक्यातील २७ शाळांमध्ये तब्बल ९०२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावून शिक्षण घेतले आहे. तालुक्यात एकूण ६३३२ एवढी विद्यार्थी सन्ख्या आहे. ४२२ शिक्षक व १६८ शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. कोव्हिड चाचणी करण्यात आलेले ३३५ शिक्षक व १०३ शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. यापैकी एकाचाही कोव्हिड पॉझिटीव्ह अहवाल आलेला नाही.

Comments
Post a Comment